Vastu Tips – घरात कोणत्या दिशेला औषधे ठेवावीत, वास्तुशास्त्र काय सांगते, जाणून घ्या

शरीर निरोगी असणे, ही व्यक्तिची खरी संपत्ती आहे. आरोग्य बिघडलेलं असेल तर मिळालेलं सुखही उपभोगता येत नाही. याकरिता प्रत्येकाने आपल्याच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आरोग्य बिघडण्याची अनेक कारणे असू शकतात. त्यापैकी वास्तूदोष हेही एक कारण असू शकते. घरात वास्तुदोष असल्यास शारीरिक आजारपणावर त्याचा परिणाम होतो. वास्तुशास्त्रानुसार घरात औषधे ठेवण्याची जागा अयोग्य असल्यास त्याचाही आरोग्यावर परिणाम होऊ शकतो तसेच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे व्यक्ती आजारी पडू शकते. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार औषधे ठेवण्याची योग्य जागा माहित करून घेणे आवश्यक आहे.

औषधे ठेवण्याची चुकीची जागा
वास्तुशास्त्रानुसार, घराच्या उत्तर आणि पश्चिम कोनात औषधे ठेवणे टाळावे. या दिशेला औषधे ठेवल्याने औषधांचा परिणाम खूप हळूहळू होतो. आग्नेय किंवा दक्षिण दिशेला औषधे ठेवल्यास सतत आजारपणाच्या तक्रारी उद्भवतात. स्वयंपाकघरामध्ये आणि विशेषत: स्वयंपाकाच्या ओट्यावर औषधे ठेवल्याने व्यक्ती आयुष्यभर कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रस्त राहू शकते.

औषधे ठेवण्याची योग्य जागा
वास्तुशास्त्रानुसार, औषधाची पेटी नेहमी घरामध्ये ईशान्य कोनात म्हणजे उत्तर-पूर्व दिशेला ठेवावी. या जागी प्रथमोपचार किट ठेवणेदेखील चांगले मानले जाते. येथे औषधे ठेवल्याने व्यक्ती निरोगी राहते आणि लवकर बरी होते.