डोनाल्ड ट्रम्प यांची सभा सुरू असताना व्हाईट हाऊसच्या बाहेर गोळीबार

647

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे घर असलेल्या व्हाईट हाऊस परिसरात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सभा सुरू असतानाच हा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये सभा (ब्रीफिंग) सुरू होती. त्या दरम्यानच एका माणसाने गोळीबार केला. सुदैवाने तिथे उपस्थित असलेल्या यूएस सिक्रेट सर्विसच्या अधिकाऱ्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत गोळीबार करण्याऱ्यावर गोळी झाडली आणि त्याला जखमी केलं. या आरोपीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेची पुष्टी अमेरिकेच्या सीक्रेट सर्विसनेही केली आहे.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या सर्विसचे आभार मानले आहेत. तसेच या गोळीबाराविषयी ट्वीट करून माहितीही दिली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या