पेण-अलिबागचा पांढरा कांदा बाजारात दाखल

148

सामना ऑनलाईन,उरण

पेण,अलिबाग येथील प्रसिध्द पांढरा कांदा उरणच्या बाजारात दाखल झाल्याने खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे.सफेद कांदा आयुर्वेदात बहुगुणी असल्याचे वर्णन असल्याचे सांगितले जाते.पचनक्रियेस मदत करणारा पांढरा कांदा गुणकारी आणि औषधी असल्याचेही मानले जाते.जेवणाबरोबर पांढरा कांदा सर्रास वापरला जातो.

रायगड जिल्ह्यातील पेण,अलिबाग तालुक्यात पांढरा कांदा मोठ्या प्रमाणात पिकविला जातो.पांढरा कांद्याला मागणीही असते.त्यामुळे अलिबाग,पेण,वडखळ नाका हमरस्त्यांवर दुकाने,हातगाड्यांवर पांढऱया कांद्याच्या माळा विक्रीसाठी ठेवलेला दिसतो. हमरस्त्यांवरुन प्रवास करणारे अनेकजण पांढरा खरेदी करताना दिसतात.कांद्याच्या मोठा, मध्यम,लहान अशा आकारावर माळेची किंमत आकारली जाते. पांढऱया कांद्यांची माळ साधारणपणे ८० ते १२० रुपयांना मिळते

उरण बाजारपेठेत अलिबाग,पेण तालुक्यातील नवखार,रेवस आदी गावतील विक्रेते पांढरा कांदा तरीतून विक्रीस आणून विक्री करतायत. मोठ्या प्रमाणात आलेल्या पांढऱया काद्यांच्या माळेने सध्या उरणची बाजारपेठ सजलीय.हा कांदा खरेदीसाठी ग्राहकांचीही गर्दी होऊ लागली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या