शशांकच्या आयुष्यातली ‘ती’ कोण? सोशल मिडीयावर चर्चांना आले उधाण

 

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेता शशांक केतकर व त्याची पूर्वपत्नी तेजश्री प्रधान यांच्यातील घटस्फोटाची प्रक्रियाही पूर्ण झालेली नसताना शशांकच्या आयुष्यात पुन्हा एकदा एक खास व्यक्ती आल्याची चर्चा सध्या सोशल मिडीयावर रंगली आहे. शशांकने नुकताच त्याच्या फेसबुक अकाऊंटवर एका मुलीसोबतचा फोटो शेअर केला आहे. ही मुलगी कोण आहे? याबाबत त्याने काहीही लिहले नसले तरी त्याच्या चाहत्यांनी त्याचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली आहे.

शशांकने शेअर केलेल्या फोटोत दिसत असलेली मुलगी हि प्रियंका ढवळे असून ती शशांकची जुनी मैत्रिण असल्याचे समजते. प्रियंकाचा फेसबुक डिपी देखील शशांकसोबतचा ब्लॅक ऍण्ड व्हाईट फोटो आहे. शशांकची धाकटी बहिण दीक्षाने देखील प्रियंकासोबतचे काही फोटो इस्टांग्रॅमवर शेअर केले आहेत. त्यामुळे प्रियंका ही फक्त शशांकच्याच नाही तर त्याच्या कुटुंबियांच्याही ख़ूप जवळ असल्याचे दिसतेय.

होणार सून मी या घरची या मालिकेत शशांक ‘श्री’ ची भूमिका साकारत होता. या मालिकेतील त्याची बायको असलेली जान्हवी म्हणजेच तेजश्री प्रधान सोबत त्याचे खऱ्या आयुष्यातही लग्न झाले होते. मात्र त्यानंतर शशांकने मानसिक छळ होत असल्याचे कारण देत न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज केला होता. त्यानंतर त्यांचे प्रकरण समुपदेशकाकडे पाठविण्यात आले आहे.