कोण आहे बॉलीवूडच्या ‘क्वीन’चा किंग ?

38

सामना ऑनलाईन। मुंबई

लाईक करा, ट्विट करा

बॉलिवूडची ‘क्वीन’ आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री कंगना रानावतसाठी २०१७ हे वर्ष लकी ठरणार आहे. कारण येत्या वर्षात कंगना लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याचे तिने जाहीर केले आहे. मात्र ती कुणासोबत लग्न करणार हे मात्र तिने गुलदस्त्यातच ठेवले आहे.

एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांनी कंगनाला नवीन वर्षातील प्लॅन्सविषयी विचारले. त्यावेळी तिने आपण २०१७ मध्ये लग्न करणार असल्याचे बिनधास्तपणे सांगितले. मात्र तो ‘लकी मॅन’ कोण आहे याबाबत मात्र तीने सुंदरशी स्माईल देत मौन बाळगलं. २०१६ मध्ये मोठय़ा पडद्यापासून दूर राहीलेल्या कंगनाचे २०१७ मध्ये ‘रंगून’ व ‘सिमरन’ हे दोन बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या