WHO चा इशारा; तर या देशांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता

4892

ज्या देशांमध्ये कोरोनाव्हायरसचा संसर्ग कमी होत आहेत त्यांना अजूनही हा प्रकोप थांबविण्याच्या उपाययोजना थांबवू नये, तडकाफडकी लॉकडाऊन पूर्ण उठवून नियमांचे काटेकोरपणे पालन न केल्यास कोरोनाच्या “दुसर्‍या प्रकोपाचा” चा सामना करावा लागू शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने सोमवारी दिला आहे.

कोरोनाव्हायरसच्या उद्रेकाच्या पहिल्या टप्प्याच्या मध्यावर जगातील अनेक देश उभे आहेत. तर काही देशांमध्ये आता नवे कोरोना रुग्ण आढळणे कमी झाले आहे. त्यामुळे आर्थिक घडी व्यवस्थित करण्याच्या उद्देशाने असे देश नियम शिथील करणे, तसेच लॉकडाऊन उठवण्याचा विचार करत आहेत. मात्र हे धोकादायक असून अशा देशांमध्ये कोरोना महामारीची दुसरी भयंकर लाट झेलावी लागण्याची शक्यता, डब्ल्यूएचओच्या आपत्कालीन विभाग प्रमुख डॉ. माईक रायन यांनी ऑनलाईन ब्रीफिंगमध्ये वर्तवली आहे. ‘बर्‍याच देशांमध्ये कोरोनाची प्रकरणे कमी होत असताना मध्य आणि दक्षिण अमेरिका, दक्षिण आशिया आणि आफ्रिका या देशांमध्ये अजूनही त्यांची वाढ होत आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

रायन म्हणाले की, साथीचे रोग बर्‍याचदा टप्प्यांमध्ये (लाटांप्रमाणे) येतात, ज्याचा अर्थ असा होतो की साथीच्या पहिल्या टप्प्यातील उद्रेक जिथे शांत झाला आहे, अशा ठिकाणी या वर्षाच्या शेवटी पुन्हा एकदा उद्रेक होऊ शकतो. पहिल्या टप्प्यात केलेल्या उपाययोजना जर पाळल्या नाहीत आणि नियम शिथील केल्यास संक्रमणाचे प्रमाण पुन्हा वाढण्याची शक्यताही आहे.

परंतु साथीचा आजार कोणत्याही वेळी डोकें वर काढू शकतो हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. नव्या रुग्णांची संख्या कमी होत आहे, त्यामुळे आता धोका नाही असे आपण गृहित धरू शकत नाही. याउलट दुसरी लाट लवकर येऊ नये यासाठी अधिक दक्ष राहणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या