पर्रीकरांसाठी कोण सोडणार आमदारकी ?

31

सामना ऑनलाईन । पणजी

गोव्याच्या मुख्यमंत्रिपदासाठीचा शपथविधीचा सोहळा आज पार पडणार आहेत. मनोहर पर्रीकर यांचे नाव गोव्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी भाजपातर्फे निश्चित करण्यात आले आहे. मात्र शपथ घेतल्यानंतर आणि भाजपाने बहुमत सिद्ध केल्यानंतर त्यांना गोव्याच्या विधानसभेत आमदार म्हणून निवडून यावे लागेल. आता त्यांच्या आमदारकीसाठी कोणता आमदार आपल्या आमदारकीवर पाणी सोडणार हे पहावे लागेल.

मनोहर पर्रीकर पणजी मतदारसंघातून आजवर ५ वेळा निवडून आले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणाहून ते निवडणूक लढवू शकतात. याच मतदारसंघातून सध्या सिद्धार्थ कुंकळ्येकर हे भाजपाचे आमदार निवडून आले आहेत. पर्रीकर संरक्षणमंत्री झाल्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे या मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत पर्रीकरांचेच सचिव  कुंकळ्येकर निवडून आले होते, पर्रीकरांसाठी त्यांचाच बळी दिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरी शक्यता म्हणजे भाजपचे आमदार फ्रांसिस डिसूझा यांची प्रकृती ठिक नसल्याने ते आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊ शकतात.

आपली प्रतिक्रिया द्या