लालबाग उड्डाणपुलाच्या डागडुजीचे पैसे कोण देणार; हायकोर्टाचा सवाल

33

सामना ऑनलाईन, मुंबई
लालबाग उड्डाणपुलाच्या डागडुजीवर होणारा खर्च कोण देणार असा मुद्दा उच्च न्यायालयाने आज उपस्थित केला. कामाची देखभाल करणाऱ्या सिप्लेक्स कंपनीची मुदत संपल्यानंतर त्याच कंपनीला निविदा न काढता डागडुजीचे काम पुन्हा देण्याचा निर्णय पालिकेने घेतला. त्यामुळे न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी हा प्रश्न उपस्थित केला.

‘एमएमआरडीए’चे कंत्राट संपल्यानंतर पालिका पुन्हा त्या कंपनीला कंत्राट देऊ शकते का अशी विचारणाही खंडपीठाने एमएमआरडीएकडे केली आहे. लालबाग उड्डाणपुलाच्या निकृष्ट कामाकडे लक्ष वेधणाऱ्या जनहित याचिकेच्या सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. यावेळी जुन्याच कंत्राटदाराला काम देण्याचा पालिकेला अधिकार आहे काय, या कामाचे पैसे नेमके कोण देणार अशी विचारणा केली. तसेच एमएमआरडीएला याबाबत भूमिका स्पष्ट करावी असे निर्देश देऊन याचिकेची पुढील सुनावणी २७ मार्च रोजी ठेवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या