केळीचा आकार वाकडा का असतो? जाणून घ्या यामागचे कारण…

केळीचा आकार वाकडा का असतो? असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडला असेल. आज आम्ही तुम्हाला यामागचे नेमके काय कारण आहे, याबद्दल माहिती सांगणार आहोत. केळीला येणारी फळे ही घडामध्ये येतात याला लोंगर असे म्हणतात. एक घडामध्ये साधारणत: 10 फण्या असतात तर एका फणीमध्ये 16-18 केळी असतात. याचे फुल/फुलोरा हे तपकिरी रंगाचे असते. कच्ची फळे हिरवी तर पिकलेली पिवळी दिसतात.

आपण शाळेत शिकलोच आहोत की झाडांची वाढ सूर्यकिरणांच्या दिशेने होत असते. तसेच फळांची उत्क्रांती फुलांपासून होते. केळीच्या वाढीसाठी सूर्यप्रकाश सर्वात महत्वाचा आहे. थंड आणि बर्फाळ प्रदेशात पारंपरिक केळीची लागवड सहसा होत नाही. उष्णकटिबंध प्रदेश केळीसाठी पोषक समजला जातो.

केळीच्या फुलोऱ्याची कळी दिसायला मक्याच्या कणसासारखी असते. वाढ होताना ही कळी थोड्याफार प्रमाणात वजनदार असल्यामुळे जमिनीच्या दिशेने वाढते. खालील छायाचित्रात नीट समजून घेता येईल.

untitled-2-copy

1. नुकतीच उमललेली कळी.

2. जमिनीच्या दिशेने झुकलेली कळी.

3. अंकुर रूपातील केळीची फणी.

4. एका फुलोऱ्यापासून विकसित झालेला लोंगर.

कळी फुलल्यानंतर फुलोऱ्यातील प्रत्येकी पाकळीतून अंकुर फुटतात. हेच अंकुर नंतर केळीमध्ये उत्क्रांतीत होतात. हे अंकुर सुरुवातीला सरळ असतात. नंतर त्यांची वाढ सूर्याच्या दिशेने अर्थात गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध होते. ज्यामुळे केळीचा आकार वाकडा होतो. हे एकमेव फळ आहे, ज्याची गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात जाऊन उलटी वाढ होते.

कोरा (quora) या प्रश्न उत्तरांच्या एका संकेतस्थळावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना राहुल जाधव यांनी ही माहिती दिली.

आपली प्रतिक्रिया द्या