‘क्राईम शो’ पाहून प्रेयसीला बनवले ‘मोहरा’, संपत्तीच्या हव्यासापोटी आधी मित्रासोबत लग्न लावले, नंतर …

1808
murder

संपत्तीच्या हव्यासापोटी आजपर्यंत कितीतरी खून झाल्याचे तुम्ही ऐकले असेल. मात्र मित्राच्या संपत्तीवर डोळा ठेऊन त्यासाठी स्वतःच्या प्रेयसीला मोहरा बनवल्याचे प्रकरण लाखात एक आहे. असाच काहिसा प्रकार गाझियाबाद जिल्ह्यात घडला.

गाझियाबाद जिल्ह्यातील मुरदाबाद येथे शंकर विहार कॉलनीत राहणाऱ्या तरुणाचा संपत्तीच्या हव्यासापोटी मित्रानेच खून केला. मित्राची संपत्ती हडपण्यासाठी तरुणाने स्वतःच्या प्रेयसीचे त्याच्यासोबत लग्न लावून दिले. लग्नानंतर संपत्ती तिच्या नावावर होताच दोघांनी मिळून त्याचा काटा काढला. पोलिसांनी या प्रकरणी मृत तरुणाची पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. क्राईम शॉ पाहून आपण हत्येचा कट रचल्याचे आरोपीने कबूल केले आहे.

शंकर विहार कॉलनीत राहणाऱ्या 48 वर्षीय अशोक शर्मा या व्यक्तीचा मृतदेह घरातील बाथरूममध्ये आढळला. अशोकची पत्नी शालू हिने अंघोळ करताना करंट लागून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. मात्र मयताच्या भावांनी हत्येचा संशय व्यक्त केला. शवविच्छेदन अहवालात अशोक यांचा गळा दाबून खून झाल्याचे समोर आले. या नंतर पोलिसांनी मयताच्या पत्नीला आज तिच्या प्रियकराला (कपिल) ताब्यात घेतले. पोलीस चौकशीमध्ये त्यांनी धक्कादायक खुलासा केला.

आरोपी कपिल कुमार टॅक्सी चालवतो आणि शालू हिच्या पहिल्या पतीचा अपघातात मृत्यू झालेला होता. पतीच्या मृत्यूनंतर कामाच्या शोधात असलेल्या शालू आणि कपिल यांच्यात जवळीक निर्माण झाली. टॅक्सी ड्रायव्हरकॅगे काम सुरू असताना कपिलची ओळख अशोक शर्माशी झाली. अशोक दिव्यांग होता आणि त्याचे लग्नही झालेले नव्हते. गडगंज संपत्ती असल्याने कपिलने कट रचत अशोकचे लग्न स्वतःची प्रेयसी शालूसोबत लावून दिले.

लग्नानंतर कपिलचे अशोकच्या घरी वरच्यावर येणे सुरू होते. मात्र कुटुंबीयांनी विरोध केल्याने त्याने त्याच्या घरी जाने बंद केले आणि चहाचे दुकान टाकले. या बहाण्याने शालू त्याला भेटायला येऊ लागली. मात्र याचा सुगावा लागल्याने अशोकने विरोध केला. याच दरम्यान क्राईम शो पाहून कपिलची अशोकच्या हत्येचा कट रचला. 28 मे रोजी आरोपीने अशोकची हत्या केली. दोघांनी अशोकचा मृत्यू करंट लागून झाल्याचा बनाव रचला मात्र पोलीस तपासात सत्य उघड झाले.

आपली प्रतिक्रिया द्या