नवऱ्यासोबत रोमांस कसा करायचे ते शिक! मोलकरणीने टोमणा मारल्याने पत्नीने धुलाई केली

नवऱ्यासोबत रोमांस कसा करायचा हे शिक! असा टोमणा मारल्याने मोलकरणीची मालकिणीने धुलाई केली आहे. ‘लोला’ (बदललेलं नाव) ही ‘मॉरीस’च्या घरी काम करते. मॉरीसने लोलाला पार्किग लॉटमधल्या एका गाडीमध्ये बसलेलं पाहिलं होतं. मॉरीसने लोलाच्या दिशेने जात तिला शिवी दिली होती. यावर लोलाने तिला नवऱ्यासोबत रोमांस कसा करायचा हे शिक! असा टोमणा मारला होता. हे ऐकल्यानंतर मॉरीस अशी काही पिसाळली की तिने ‘लोला’ला सळो की पळो करून सोडलं. गाडीच्या खिडकीची काच उघडी असल्याने मॉरीसने खिडकीतून हात घालत लोलाच्या झिंज्या उपटल्या, यानंतर तिने तुफान गुद्देबादी करत लोलाला जखमी केलं होतं. सदर प्रकरण हे आता कोर्टात गेलं असून, या प्रकरणाच्या सुनावणीतून धक्कादायक बाबी उजेडात आल्या आहेत.

लोला आणि मॉरीसच्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध होते. मॉरीसला या दोघांच्या लफड्याबद्दल कळालं होतं, ज्यामुळे ती संतापलेली होती. दोन मुलांची आई असलेल्या मॉरीसला लोला गाडीत बसलेली दिसली तेव्हा तिचा राग अनावर झाला होता आणि तिने तिला तुफान मारहाण केली होती. या मारहाणीत लोलाचे काही केस उपटले गेले असून तिच्या चेहऱ्यावर जखमांच्या खुणा स्पष्टपणे दिसत आहेत.

लोला ही मॉरीसच्या घरी जवळपास 4 वर्ष काम करत आहे. 7-8 दिवसांपूर्वी मॉरीसला तिच्या नवऱ्याचं आणि लोलाचे संबंध असल्याचं कळालं होतं. पती आणि लोला यांच्यातील सेक्शुअल मेसेज आणि नग्न फोटोंच्या देवाणघेवाणीमुळे मॉरीसला या दोघांमध्ये काहीतरी लफडं असल्याचं कळालं होतं. न्यायालयामध्ये हे प्रकरण गेलं असता मॉरीसने लोला ला मारहाण केल्याचं कबूल केलं आहे. मॉरीस अजूनही तिच्या नवऱ्यासोबतच राहात आहे.