लॉकडाऊनमध्ये नोकरी मिळाली नाही, पत्नीने केली पतीची हत्या

1307
प्रातिनिधिक

लॉकडाऊनमध्ये नोकरी मिळाली नाही म्हणून एका पत्नीने तिच्या पतीची बेदम मारहाण करत हत्या केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशमधील खांडवा येथे घडली आहे . या प्रकरणी पोलिसांनी लीला व तिची आई प्रेमाबाई यांना अटक केली आहे.

खांडवा जिल्ह्यातील खारकाला गावात राहणारा रमेश याचे काम लॉकडाऊनमुळे थांबले होते. तेव्हापासून त्याची बायको लीला हिने त्याच्याकडे नोकरी शोध असा तगादा लावला होता. मात्र लॉकडाऊमुळे नोकरी मिळत नसल्याचे रमेशने लीला समजावले. मात्र ती समजण्यास तयार नव्हती. 24 मे रोजी रमेश व लीलाचे पुन्हा नोकरी शोधण्यावरून वाद झाले. त्यानंतर लीला व तिची आई प्रेमा बाई यांनी काठ्यांनी रमेशला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तो जबर जखमी झाला होता. त्याला त्याच अवस्थेत घरात सोडून लीला व प्रेमा बाई बाजारात गेल्या. त्या दरम्यान रमेशने त्याच्या भावाला फोन करून बोलावले. त्यानंतर भावाने रमेशला रुग्णालयात दाखल केले. तेथे रमेशने पोलिसांना पत्नीच्या अत्याचाराबाबत सांगितले. त्यानंतर उपचारादरम्यान 29 मे रोजी रमेशचा मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या