लग्नानंतर दोन वर्षं बायकोने सेक्सला नकार दिला, नैराश्यापोटी नवऱ्याची आत्महत्या

4651

लग्नाला दोन वर्षं होत आली तरी बायकोने शरीरसंबंधाला नकार दिल्यामुळे निराश झालेल्या नवऱ्याने आत्महत्या केली आहे. ही घटना गुजरातमधील अहमदाबाद येथे घडली असून या प्रकरणी या इसमाच्या बायकोवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, सुदर्शनसिंह परमार या घटस्फोटित माणसाचं लग्न 2018मध्ये गीता हिच्याशी झालं होतं. गीता हिचेही दोन घटस्फोट झाले आहेत. लग्नानंतर काही महिन्यांनी सुदर्शनसिंह आणि गीता यांच्यात बिनसत असल्याचं सुदर्शन याची आई मूली हिला लक्षात येऊ लागलं. एक दिवस त्या दोघांच्या खोलीत गेल्यानंतर पती आणि पत्नी वेगवेगळे झोपत असल्याचं त्यांना आढळलं. त्यांनी याचं कारण सुदर्शनला विचारलं. त्यावर गीता हिने नवऱ्यासोबत न झोपण्याची शपथ घेतल्याचं कारण सुदर्शन याने आईला सांगितलं.

काही काळाने या दांपत्यात क्षुल्लक कारणावरून वाद होऊ लागले. त्यांचं भांडण इतकं विकोपाल गेलं की गीताने सासर सोडून माहेरी राहायला सुरुवात केली. यामुळे सुदर्शनसिंह याला नैराश्य येऊ लागलं. त्याने गीताचा फोन नंबरही ब्लॉक केल्याची माहिती मूली यांनी दिली आहे. 27 जुलै रोजी सर्व कुटुंबीय जवळच्याच एका मयतीला गेल्यानंतर सुदर्शनसिंहने गळफास लावून आत्महत्या केली.

त्याच्या आत्महत्येनंतर त्याची आई मूली परमार हिने पोलिसांत तक्रार दाखल केली. पत्नीने शरीरसुखापासून वंचित ठेवल्याने मुलाने आत्महत्या केल्याचं त्यांच्या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. त्यानुसार पोलिसांनी गीता हिच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या