अतुल तापकीर आत्महत्या, पत्नीला अटक

33

सामना ऑनलाईन । पुणे

मराठी चित्रपट निर्माते अतुल तापकीर यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांची पत्नी प्रियंका, तिचा भाऊ प्रसाद आणि कल्याण गव्हाणे या तिघांना काल डेक्कन पोलिसांनी अटक केली. अतुल तापकीर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांच्या पत्नीसह इतरांवर डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पत्नी प्रियंका अतुल तापकीर हिच्यासह सुसाईड नोटमध्ये नमूद केलेले तिचे भाऊ, मैत्रिणी यांच्यावर कलम ३०६, ३४ यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

कर्वे रस्त्यावरील हॉटेल प्रेसिडेंट येथे अतुल तापकीर यांनी विषप्राशन करून आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर सुसाईड नोट पोस्ट करून त्यामध्ये चित्रपट निर्मीतीमध्ये झालेला तोटा आणि पत्नी प्रियंकाने त्यांचा छळ केला. तिचे मानलेले भाऊ कल्याण गव्हाणे, बाळू गव्हाणे या दोघांनी त्यांना मारहाण केली, मावसभाऊ बाप्पू थिगळेने फोन करून धमक्या दिल्या. गणेशनगर येथे राहणाऱ्या मैत्रिणींवरही त्यांनी सुसाईड नोटमध्ये आरोप केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या