पत्नीने फेसबुक हॅक केलंय, टीम इंडियाच्या गोलंदाजाचा दावा

3376

टीम इंडियाचा खेळाडू भुवनेश्वर कुमार याने त्याची पत्नी नुपूर डगर हिने त्याचे फेसबुक अकाऊंट हॅक केल्याचा दावा केला आहे. बायकोने फेसबुक हॅक केल्यापासून तो ते अकाऊंट वापरतच नसल्याचे त्याने एका चॅट शोमध्ये सांगितले.

bhuvneshwar-kumar

भुवनेश्वर कुमार हा टीम इंडियाचा मध्यम गतीचा गोलंदाज आहे. शांत स्वभावाचा भुवनेश्वर हा फिल्डवर तितकाच आक्रमक खेळ खेळतो. नुकतेच क्रिकबझ वरील एका कार्यक्रमात भुवनेश्वर व त्याच्या पत्नीची मुलाखत घेण्यात आली यावेळी भुवनेश्वरला त्याच्या सोशल मीडियाविषयी विचारले असता त्याने पत्नीने त्याचे फेसबुक अकाऊंट हॅक केल्याचे सांगितले आहे. ‘नुपूर माझ्याकडे फेसबुकचा पासवर्ड मागत होती मात्र मी कायम काही ना काही बहाने बनवायचो. त्यामुळे एके दिवशी तिने थेट येऊन मला सांगितले की हा तुझ्या अकाऊंटचा नवीन पासवर्ड आहे. तिने चक्क माझं अकाऊंट हॅक केलेले. तेव्हापासून मी फेसबुक वापरणंच बंद केलं.’, असं भुवनेश्वरने सांगितले.

bhuvneshwar-kumar-reception

आपली प्रतिक्रिया द्या