‘वाईफ इज ऑलवेज राईट’ विद्या भवनात

तेजराज प्रॉडक्शन्सच्या तेजस गोहिल यांची प्रस्तुती असलेले ‘वाईफ इज ऑलवेज राईट’ हे गुजराती नाटक येत्या रविवारी 16 सप्टेंबरला चौपाटीवरील भारतीय विद्या भवनात सायंकाळी साडेसात वाजता दाखवले जाणार आहे. भावेश झवेरी, भविष्य गोहिल, मधुकर भक्त यांची निर्मिती असलेल्या या नाटकाचे लेखन प्रणव त्रिपाठी यांनी केलेलं असून प्रसाद खांडकेकर यांनी त्याला दिग्दर्शन दिले आहे. हे कॉमेडी नाटक दोन दांपत्यांवर आणि त्यांच्या मुलांभोवती फिरते. यात रितेश मोभ, भविष्य ठाकूर, योजना वाच्छानी यांच्या प्रमुख भूमिका असून सची जोशी, रचना पकाई, अक्षर जोशी, ध्रुवेश भट्ट, प्रसाद भट्ट, हरेश पांचाळ आणि अजय पारेख यांच्याही भूमिका पाहायला मिळतील.