प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा

15
प्रातिनिधिक छायाचित्र

सामना प्रतिनिधी । माजलगाव

प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा गळा दाबून खून केल्यानंतर त्याचा मृतदेह शेतातील तारेच्या कुंपणावर फेकून देत शॉक लागून मृत्यू झाल्याचा बनाव करणाऱ्या पत्नीचा खरा चेहरा माजलगाव पोलिसांनी अवघ्या बारा तासात जगासमोर आणला. तिच्या प्रियकरास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

माजलगाव तालुक्यातील शहजानपुर येथील 32 वर्षीय बालासाहेब जनार्दन शिंदे यांचा शॉक लागून मृत्यू झाल्याची माहिती गुरुवारी पोलिसांना मिळाली होती. आज सकाळी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला असता बालासाहेब शिंदे यांचा शॉक लागून नव्हे तर त्यांचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे लक्षात आले. पोलिसांनी उपविभागीय अधिकारी अर्जुन भोसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास दांडे यांनी या प्रकरणी तपास केला असता धक्कादायक बाब समोर आली बालासाहेब शिंदे यांची पत्नी कावेरी हिचे बाहेरच्या व्यक्ती सोबत सूत जुळलेले होते. रात्री प्रियकर विठ्ठल गुलाबराव आगे यांच्या मदतीने तिने नवरा बाळासाहेब याचा गळा आवळून खून करत कोणाला माहिती होऊ नये म्हणून शॉक लागल्याचा बनाव केला मात्र पोलिसांनी अवघ्या 12 तासात तपास करत पत्नी आणि प्रियकारावर खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यांना अटक करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या