परदेशी महिलेसोबत पाहिल्याने पत्नीकडून पतीची हत्या, हत्येनंतर मृतदेहाच्या अवयवांची बिर्याणी शिजवून खाल्ली

murder-knife

एखाद्याची हत्या करणे आणि नंतर त्याचे अवयव शिजवून खाणे असा विचार केला तरी तुम्हाला धडकी भरेल. एखाद्या क्राईम शो मध्ये किंवा क्राइम मॅगझिनमध्ये अशी घटना तुमच्या पाहण्यात किंवा वाचनात आली असेल. मात्र ही भीतीदायक घटना इराणमध्ये घडली असून या प्रकरणाने सर्वांनाच धक्का बसला आहे. इराण मधील तेहरानची राजधानी इस्लामशहर येथे ही घटना घडली आहे.

काही दिवसांपूर्वी पोलिसांना छिन्नविछिन्न अवस्थेत एका पुरुषाचा मृतदेह सापडला होता. यावेळी त्या इसमाच्या पत्नीने स्वतः पोलिसांसमोर पतीच्या हत्येचा गुन्हा कबूल केला. या महिलेचे वय 22 वर्षे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेला तिच्या पतीचे परदेशी महिलेसोबत असणाऱ्या अनैतिक संबंधांबाबत माहिती मिळाली होती. एके दिवशी तिने आपल्या पतीला त्या महिलेसह घरातच रंगेहाथ पकडले होते. महिलेच्या म्हणण्यानुसार, त्या इसमासोबत माझे लग्न बळजबरीने करण्यात आले होते. त्यामुळे त्याने तिच्यात कधी रस घेतलाच नाही. ब्रिटीश वृत्तपत्र द सनने दिलेल्या माहितीनुसार, ही महिला आपल्या पतीच्या वागण्याने कंटाळली होती. तो तिला आणि तिच्या पाच वर्षांच्या मुलीला रोज मारहाण करायचा. तसेच त्याचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध होते. काही दिवसांपूर्वी महिलेचे पतीसोबत खूप भांडण झाले.

हे भांडण सुरु असताना तिचा नवरा चाकू घेऊन आला. यावेळी महिलेने पतीच्या हातातील चाकू हिसकावला आणि पतीच्या शरीरावर सपासप वार केले. या हल्ल्यामुळे तिचा पती बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला. पतीचा मृत्यू झाल्याचे कळताच या महिलेने पतीच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि नंतर ते बिर्याणी प्रमाणे शिजवले. अवयव शिजल्यानंतर महिलेने ते खाल्ले. काही दिवसांनी शेजाऱ्यांना घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. इस्लामशहरचे पोलीस प्रमुख कर्नल अली आगाकरखान यांनी सांगितले की, महिलेने सुरुवातीला घटनेबद्दल चुकीची माहिती सांगितली पण नंतर तिने पतीचा जीव कसा घेतला याबाबत सविस्तरपणे सांगितले.