फुटिरतावाद्यांचे पाकिस्तानशी घरगुती संबंध, वाचा धक्कादायक बातमी

28321

फुटिरतावादी यासिन मलिक याची पत्नी मशाल मलिक हिने इस्लामाबाद येथे पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन साजरा केला आहे. मशाल हिने तिथे पाकिस्तानचा झेंडा फडकवला असून तेथील जनतेसमोर भाषण देखील ठोकले आहे.

जम्मू-कश्मीर लिबरेशन फ्रंट (जेकेएलएफ) या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेचा प्रमुख व फुटिरतावादी नेता यासिन मलिक याला राष्ट्रीय तपास संस्थेने 10 एप्रिलला अटक केली. अटकेनंतर त्याला दिल्लीत आणले असून सध्या त्याला तिहार जेलमध्ये ठेवण्यात आहे. फेब्रुवारीमध्ये पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने यासिन मलिकच्या जेकेएलएफवर बंदी घातली होती. दहशतवादीविरोधी कायद्याखाली त्याच्या या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या