मधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम

249

सामना ऑनलाईन । रोहतक

लग्नानंतर प्रत्येक नवविवाहीत जोडप्याला वेध लागलेले असतात ते मधुचंद्राच्या रात्रीचे. हरयाणामध्ये मधुचंद्राच्या रात्री पत्नीने केलेली मागणी ऐकून पतीला घाम फुटला. येथील नवविवाहीत पत्नीने मधुचंद्राच्या रात्री मला दाढी-मिशा ठेवणारा आणि कुर्ता-पायजमा घालणारा नाही तर जिन्स-टीशर्ट घालणारा मॉडर्न नवरा हवाय अशी मागणी करत एकत्र राहण्यास नकार दिला.

हे सर्व प्रकरण हरयाणातील मलिकपूर येथील आहे. पीडित पुरूषाचे नाव गुलफाम असे आहे. गुलफामने स्वप्नातही हा विचार केला नसेल की आठ महिन्यांपूर्वी जिच्यासोबत लग्न ठरले, विधी-परंपरा आणि सर्वांच्या साक्षीने जिच्यासोबत निकाह झाला, तीच पत्नी मला दाढी-मिशा ठेवणारा आणि कुर्ता-पायजमा घालणारा नाही तर जिन्स-टीशर्ट घालणारा मॉडर्न नवरा हवाय असे म्हणत नकार देईल. पत्नीची ही अजब मागणी ऐकून गुलफामने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु मधुचंद्राच्या रात्रीच ती त्याला सोडून आपल्या भावांसह माहेरी निघून गेली.

गुलफामचा निकाह 9 सप्टेंबरला झाला होता. आठ महिन्यांपूर्वी त्यांचा विवाह ठरला होता. मधुचंद्राच्या रात्री गुलफामच्या पत्नीने त्याला पाहिले तेव्हा तिने मुलगा पसंद नसल्याचे सांगितले. मुलगा दाढी-मिशावाला, कुर्ता-पायजमा घालणारा आहे. परंतु आमच्या घरात सर्वच मॉडर्न विचाराचे आणि तसेच कपडे घालणारे आहेत. त्यामुळे या घरात मी राहू शकत नाही, असे गुलफामच्या पत्नीने म्हटले. त्यानंतर तिने भावांसह घर सोडले. जाताने तिने घरातील दागिने आणि रोकड नेल्याची तक्रार गुलफामने केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या