पतीने दिला धोका; पत्नीने रात्री पतीच्या गुप्तांगात फसवला नटबोल्ट

पतीपत्नींमध्ये वादविवाद झाल्यास किंवा फसवणूक झाल्यास अनेकजण घटस्फोट घेत स्वतःची सुटका करून घेतात. मात्र, काहीजण झालेली फसवणूक विसरू शकत नाही आणि जोडीदाराचा बदला घेण्याचे ठरवतात. युक्रेनमध्ये अशीच धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीने पतीचा बदला घेण्यासाठी असे कृत्य केले की ते पतीच्या जिवावर बेतले आहे. तो यातून थोडक्यात बचावला आहे.

पती आपली फसवणूक करत आहे. त्याचे विवाहबाह्य संबंध आहेत. अशी शंका युक्रेमधील महिलेला होती. पतीने आपल्याला धोका दिल्याचे तिचे ठाम मत होते. यासाठी पतीला धडा शिकवायचा असे तिने ठरवले. यासाठी तिने धक्कादायक कट रचला.

घरात रात्री पती झोपला असताना महिलेने त्याच्या गुप्तांगात लोखंडी नट अडकवला. तो गुप्तांगात अडकल्याने पती वेदनेने विव्हळू लागला. त्याने नट काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, नट निघत नसून त्याच्या वेदना वाढत होत्या. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. ‘द सन’ ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

डॉक्टरांनी शस्त्रक्रियेशिवाय नट काढण्याचे शक्य तितके प्रयत्न केले. मात्र, त्यात यश येत नव्हते. तसेच त्याच्या वेदनाही वाढत होत्या. त्यामुळे डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे सांगितले. वेदना असह्य होत असल्याने रुग्ण शस्त्रक्रियेसाठी तयार झाला.

रुग्ण शस्त्रक्रियेसाठी तयार झाल्यावर डॉक्टरांनी कोबरा रेस्क्यू विशेष पथकाला बोलावले. या पथकाने काळजी घेत अँगल ग्राइंडरच्या मदतीने लोंखडी नट कापून रुग्णाची सुटका केली. ही शस्त्रक्रिया खूप धोकादायक होती, असे पथकाचे
उपप्रमुख एडुआई नेखोरोश्व यांनी सांगितले.

रुग्णांच्या गुप्तांगाला कोणताही धोका न पोहचवता तो लोंखडी नट कापणे खूप जिकीरीचे होते. यात थोडीही चूक झाली असती तर त्याच्या जीवावर बेतले असते. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्याची प्रकृती सुधारत आहे. नवऱ्यावर संशय असल्याने त्याला धडा शिकवण्यासाठी त्याच्या पत्नीने हे विकृत कृत्य केले. ते त्याच्या जिवावर बेतले असते. सुदैवाने शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्याचा जीव वाचल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या