आई बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेतो म्हणून मुलानेच घडवली वडिलांची हत्या

murder

वडिल आई व बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेतात म्हणून मुलाने आईच्या मदतीने वडिलांची हत्या घडवून आणली. या प्रकरणी पोलिसांनी ती कॉन्ट्रॅक्ट किलर्सला अटक केली आहे. बंगळुरू शहरात महिनाभरापूर्वी ही घटना घडली होती. त्याचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे दाखवून कुटुंबीयांनी अंतिम संस्कार देखील आटपले. मात्र महिनाभरानंतर कुणीतरी पत्र लिहून पोलिसांना या हत्येबाबत सांगितले. त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला.

मोहम्मद हंजाला असे त्या मृत व्यक्तीचे नाव असून त्याच्या हत्ये प्रकरणी पोलिसांनी त्यांचा मुलगा रेहमान व पत्नी सर्वरी बेगम यांना देखील अटक केली आहे. हंजाला हा कायम त्याच्या पत्नी व मुलींवर संशय घ्यायचा. त्याच्या या संशयी स्वभावाला त्याचे घरातले वैतागले होते. त्यामुळे त्यांनी त्याचा काटा काढायचा ठरवला. त्यांनी तीन काँन्ट्रॅक्ट किलर्सला हंजालाला मारण्याची सुपारी दिली. हंजालाचा मृत्यू नैसर्गिक वाटावा म्हणून मारेकऱ्यांनी त्याच्या कुटुंबीयांना सहा झोपेच्या गोळ्या त्याच्या जेवणात मिसळायला दिल्या होत्या.

हंजालाला सर्वरी बेगम यांनी जेवणातून झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यामुळे ते गाढ झोपून गेले. त्यानंतर त्या मारेकऱ्यांनी उशीने त्यांचे नाक दाबून त्यांची हत्या केली. यात त्याचा गुदमरून मृत्यू झाला. त्यानंतर रेहमानने वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगत घाई घाईत त्यांचे अत्यंसंस्कार उरकले. वडिलांच्या मृत्यूनंतर हे सर्व कुटुंब आनंदाने राहत होते. मात्र कुणतरी अज्ञात व्यक्तीने पोलिसांना याबाबत कळवले व या सगळ्या प्रकाराचा भंडाफोड झाला.

आपली प्रतिक्रिया द्या