बायकोला लागलं टिकटॉकचं व्यसन, घटस्फोटासाठी पतीची कोर्टात धाव

532

बायकोला टिकटॉकचं व्यसन लागल्याने एका नवऱ्याने घटस्फोटासाठी कोर्टात धाव घेतली आहे. गाझियाबाद येथील हे प्रकरण असून टिकटॉकमुळे संसाराची घडी विस्कटत असल्याचं त्याने दाखल केलेल्या अर्जात म्हटलं आहे.

गाझियाबाद येथील व्यावसायिक राकेश (नाव बदललेले) याचं लग्न 2019मध्ये दिल्ली येथील तरुणी लीना (नाव बदललेले) हिच्याशी झालं. लग्नापूर्वीपासूनच लीनाला टिकटॉक व्हिडीओ बनवण्याची सवय होती. सासरी आल्यानंतरही तिने व्हिडीओ बनवायचं थांबवलं नाही. उलट तिने आता तिची नणंद आणि दीर यांनाही टिकटॉकची सवय लावली आहे, अशी तक्रार राकेश याने घटस्फोटासाठी दाखल केलेल्या अर्जात केली आहे.

राकेशने लीनाच्या कुटुंबीयांना ही गोष्ट सांगितली, तेव्हा त्यांनी तिचीच बाजू घेतल्याचं त्याचं म्हणणं आहे. टिकटॉक व्हिडीओमुळे स्वयंपाक बनवायला उशीर करते, तसंच तिला समजवायला गेल्यानंतर सतत भांडणं होतात. यामुळे संसाराची घडी विस्कटत असल्याचं राकेशचं म्हणणं आहे. त्यामुळे आपल्याला लीनापासून घटस्फोट द्यावा, अशी विनंती त्याने कोर्टाकडे केली आहे. या प्रकरणाची सुनावणी 25 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या