OMG! पतीसाठी हव्यात 3 गर्लफ्रेंड, पत्नीने दिलेल्या हटके जाहिरातीची तुफान चर्चा

पती-पत्नीमध्ये अनेकदा छोट्या-मोठ्या कुरबुरी होत असतात. कधीकधी या वादाचे कारण दोघात तिसरी व्यक्ती ठरते. दोघात तिसरी असावी असे कोणत्याच पत्नीला वाटणार नाही. परंतु एक भन्नाट घटना घडली असून पत्नी नवऱ्यासाठी एक, दोन नव्हे तर चक्क तीन गर्लफ्रेंडच्या शोधात आहे. पतीच्या आनंदासाठी पत्नीने हे पाऊल उचलले असून यासाठी एक जाहिरातही दिली आहे. याची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे.

थायलंडमधील पत्थीमा (Pattheema) नावाच्या 44 वर्षीय महिलेने ही जाहिरात दिली आहे. या महिलेने जाहिरात दिल्यानंतर अनेकींनी तिला संपर्क केला आहे. यातील एकीची निवड तिने केली असून अन्य दोन जागा खाली आहेत. पतीला खुश ठेवणाऱ्या आणि आपल्याला कामात मदत करणाऱ्या महिलांच्या आपण शोधात असल्याचे पत्थीमाने सांगितले. तसेच पतीच्या गर्लफ्रेंड बनणाऱ्यांना 32 हजार रुपये महिला पगारही देण्यात येईल असेही तिने सांगितले. याबाबत ‘Thaiger’ने वृत्त दिले आहे.

पत्थीमा हिने टिकटॉकवर एक व्हिडीओ शेअर केला असून यात तिने पती, मुलं आणि घराची देखभाल करणाऱ्या महिलांच्या शोधात असल्याचे म्हटले. या जागेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांची एचआयव्ही चाचणी होणे आवश्यक आहे. 30 ते 35 वयातील महिला यासाठी हव्या असून त्यांच्याकडे उच्च शिक्षणाची डिग्री असावी. तसेच राहण्याची आणि जेवणाची सोय मोफत आहे, असे पत्थीमाने म्हटले.

पत्थीमा डिप्रेशनमध्ये असून यामुळे ती पतीला खुश ठेऊ शकत नाहीय. तुर्तास आपल्याला एक महिला मिळाल्याचे तिने म्हटले आहे. आपण सर्व एकत्र, एकाच घरात राहू. आपल्यात भांडण होणार नाही याची शास्वती देते असेही तिने म्हटले.