पुण्यात २०० वायफाय स्पॉट बसवणार

सामना प्रतिनिधी । पुणे

शहरातील बहुचर्चित स्मार्ट सिटी प्रकल्पा अंतर्गत विविध भागात तब्बल २०० ठिकाणी वाय फाय स्पॉट तयार करण्याचे काम अंतिम टप्यात आले आहे. येत्या २६ जूनला या योजनेचे उदघाटन होणार आहे. यामध्ये पहिला अर्धा तास नागरिकांना ही सुविधा मोफत मिळणार असून, त्यानंतर माफक दरात ५१२ केबीपीएस वेगाने इंटरनेटची सुविधा पुणेकरांना उपलब्ध होणार आहे. या उपक्रमाला सुरुवात झाल्यानंतर पुणे महाराष्ट्रातील वायफाय सीटी म्हणून ओळखली जाणार आहे.

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत पुण्याची दुसऱ्या क्रमांकाचे शहर म्हणुन निवड झाली. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरात विविध प्रकल्प राबवण्यात येत आहेत. त्यामध्ये पुणे वायफाय सिटी बनविण्यात येणार आहे. त्यासाठी एल अँन्ड टी, रेलटेल आणि गुगलच्या एकत्रित प्रयत्नांतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या कामासाठी फायबर ऑप्टिक केबलचे जाळे संपूर्ण शहरात टाकण्याचे काम सुरू असून ते अंतिम टप्यात आहे. फायबर ऑप्टीकच्या साहाय्याने पालिकेची सर्व उद्याने, काही रुग्णालये, काही बस थांबे आणि ज्या ठिकाणी नागरिकांची वर्दळ सर्वाधिक आहे या प्रकारची २०० ठिकाणे निवडुन तेथे वायफाय स्पॉट उभारण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या