वाय-फाय व्हाऊचर्सची धमाल

46

रिलायन्स जिओच्या आगमनानंतर सर्वच स्पर्धक कंपन्यांमध्ये अधिकाधिक ग्राहक मिळवण्यासाठी आणि त्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी मोठी स्पर्धाच सुरू झाली आहे. नामवंत कंपन्या ग्राहकापर्यंत पोचण्यासाठी एकसे बढकर एक कल्पना लढवत आहेत आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर देखील करत आहेत. यातलेच एक नवे तंत्रज्ञान म्हणजे, ’सी-डॉट’ अर्थात ’सेंटर फॉर डेव्हलेपमेंट ऑफ टेलिमॅक्स मास मार्केट पब्लिक डेटा ऑफ टेक सोल्युशन’. नाव जरी भरभक्कम आणि अवघड वाटत असले, तरी हे तंत्रज्ञान आहे एक नंबर झकास! या तंत्रज्ञानाने बनवलेली डिव्हाइसेस अगदी एखादा चहाची टपरीवाला किंवा पानवालादेखील आपल्या दुकानाबाहेर लावू शकणार आहे. अवघ्या पन्नास हजारात हे डिव्हाईस उपलब्ध आहे. हे डिव्हाईस लावून टपरी चालक आपल्या आजूबाजूच्या ठरावीक क्षेत्रात ग्राहकांना वाय-फाय सेवा पुरवू शकणार आहे. या वाय-फायसाठीचे व्हाऊचर्स केवळ दहा रुपयांपासून उपलब्ध होणार आहेत. या नव्या तंत्रज्ञानाने इंटरनेट वापराच्या पद्धतीत आमूलाग्र बदल होणार हे निश्चित.

आपली प्रतिक्रिया द्या