सीआयए वाचते व्हॉट्सअॅपचे मेसेज

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

सीआयए आधुनिक सॉफ्टवेअरच्या मदतीने विविध स्मार्टफोन, स्मार्टटीव्ही, इंटरनेटशी जोडलेले संगणक यांच्यातील माहिती कधीही गोळा करुन तपासू शकते. व्हॉट्सअॅपचे सर्व मेसेज वाचू शकते. अगदी एनक्रिप्टेड अर्थात सुरक्षित समजले जाणारे मेसेजही आरामात वाचू शकते. सीआयचा सायबर विभाग कोणत्याही अँड्रॉइड अथवा आयओएस प्रणालीशी संबंधित अॅप किंवा प्रॉग्रॅमने गोळा केलेली माहिती मिळवून सहजतेने वाचू शकतो; असा गौप्यस्फोट ‘विकिलिक्स’ने केला आहे.

नवा गौप्यस्फोट करुन ‘विकिलिक्स’ पुन्हा एकदा अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचे गुपीत जाहीर करण्यात यशस्वी ठरले आहे. सीआयए लोकांच्या खासगी जीवनात अवाजही हस्तक्षेप करत असल्याचा आरोप नव्याने जोर धरू लागला आहे. दरम्यान, ‘विकिलिक्स’ने दिलेल्या माहितीनुसार, सीआयएचे तज्ज्ञ कोणतेही लोकप्रिय स्मार्टअॅप अथवा स्मार्टफोन हॅक करण्यात वाकबगार आहेत. व्हॉट्सअॅपचे अकाऊंट हॅक करणे त्यांना अतिशय सोपे आहे.

‘विकिलिक्स’च्या नव्या गौप्यस्फोटामुळे लोकांचे खासगी स्वातंत्र्य जपण्याला महत्त्व देतो असा दावा करणाऱ्या अमेरिकेची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या