
ओडिसाहून छत्तीसगडमार्गे गडचिरोलीत दाखल झालेले हत्तींनी आता चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे परिसरात घबराट पसरली आहे. सिंदेवाहीत शिरलेले हत्ती काही दिवसानंतर माघारी फिरत गडचिरोली जिल्हयात परत गेले होते. मात्र, पुन्हा हे हत्ती सावली तालुक्यात आढळून आले आहेत.
हत्तींनी सिंदेवाही तालुक्यात आगेकुच करीत जाटलापूर (मोठा) येथील शौचालयाजवळ असलेल्या एका व्यक्तीवर हल्ला केला. या हल्ल्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. मृताचे नाव मारोती कवडु मसराम (70) असे आहे. घटनेची माहिती मिळताच वन अधिकारी व पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. त्यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही यथे पाठविला आहे.





























































