अखेर वुहान शहरात वन्य प्राण्यांच्या शिकार आणि मांसाहारावर बंदी

1460

चीनच्या वुहान शहरातून कोरोना संपूर्ण जगात पसरला आहे. या व्हायरसने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला असतना चीनने वुहानमध्ये वन्य प्राण्यांच्या मांसाहारावर बंदी घातली आहे. पुढील पाच वर्षांसाठी ही बंदी असणार आहे.

ग्लोबल टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार वुहान सरकारच्या वेबसाईटवर एक सूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार वन्य प्राण्यांची शिकार आणि सेवनावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच वन्य प्राण्यांच्या उत्पादन आणि विक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे. त्यात स्थानिक लुप्त होत आलेल्या प्राण्यांचाही समावेश आहे.

या आदेशामुळे वुहानमध्ये कोल्हा, मगर, लांडगा, साप, उंदीर आणि मोरसह अनेक प्राणी खाण्यावर पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. तसेच कुठल्याही व्यक्ती किंवा संस्थेला वन्यजिवांशी संबंधित उत्पादन, निर्मिती करण्यास बंदी असणार आहे.

वुहानच्या वेट मार्केटामध्ये अजगर, कासव, सरडा, उंदीर, चित्त्याचे, वटवाघूळ, खवले मांजर मगरीचे मांस विकले जायच्चे. याच बाजारातून कोरोनाचा फैलाव झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. चीनमधूनच कोरोनाचा फैलाव झाला होता.  चीनच्या आहारात अशा प्रकारच्या मांसाहाराला मोठे महत्त्व आहे. आता या मांसाहारावर बंदी घालणे हे मोठे पाऊल समजले जाते. या बाजारातूनच कोरोना पसरला अशा संशय आल्याने जानेवारीतच वुहानमधील हा बाजार बंद करण्यात आला होता.

आपली प्रतिक्रिया द्या