हमे तो अपनोने लुटा, जया प्रदांनी व्यक्त केली खंत

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीत रामपूर मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार जया प्रदा सपाचे उमेदवार आझम खान यांच्यापुढे हरल्या आहेत. याबाबत त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे. पक्षांतर्गत लोकांनीच विरोधी पक्षाला मदत केली असा आरोप त्यांनी केला आहे, तसेच या बाबत आपण पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

जया प्रदा आपल्या पराभवाबाबत म्हणाल्या की, “पक्षांतर्गत लोकांनीच विरोधी पक्षाला मदत केली आहे. या लोकांच्या विरोधात पक्षश्रेष्ठींकडे आपण तक्रार करणात आहोत तसेच त्यांच्याविरोधात कडक कारवाई करावी अशी विनंती मी वरिष्ठांना करणार असल्याचे प्रदा यांनी सांगितले.

समाजवादी पक्षातून आलेल्या जया प्रदा या भाजपमध्ये सामील झाल्या होत्या. पक्षानेही त्यांना आझम खान यांच्याविरोधात तिकीट दिले होते. निवडणुकीच्या वेळी आझम खान यांनी जया प्रदांवर अश्लाघ्य भाषेत टीका केली होती.