ज्यांनी मतं दिली त्यांचाच विकास करू, काँग्रेस आमदाराचा अजब पवित्रा

27

सामना ऑनलाईन । जयपूर

राजस्थानमध्ये सत्तापालट झाली असून जनतेने काँग्रेसच्या पारड्यात भरभरून मतं टाकली. लवकरच राजस्थानमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री बसेल. परंतु सत्तास्थापनेपूर्वी काँग्रेसच्या एका नवनिर्वाचित आमदाराच्या डोक्यात सत्तेची हवा गेली की काय अशी शंका येत आहे. त्याचे कारण त्यांनी केलेले वक्तव्य. जिथून आपल्याला मत नाही मिळाले तिथून आपण विकास नाही करणार असे वक्त्यव्य राजेंद्र सिंह विधुडी यांनी केले आहे. चितोडगढ जिल्ह्यातील बेंगू विधानसभा मतदारसंघातून ते काँग्रेसच्या तिकीटावर पहिल्यांदा निवडून आले आहे.

निवडणूक जिंकल्यानंतर माध्यमकर्मींनी त्यांची प्रतिक्रिया घेतली. तेव्हा विधुडी म्हणाले की, “आपण निवडणूक जिंकलो आहोत. तर आता विकास करू. जिथून आम्हाला मतं मिळाली नाही तिथून विकास कामे करणार नाही.” तसेच ज्या ज्या कार्यकर्त्यांनी आपल्या विजयासाठी मेहनत केली त्यांचीच कामे आपण करून ज्यांनी निवडणूकीत कामे केले  नाहीत अशा कार्यकर्त्यांकडे आपण लक्षच देणार नसल्याचे विधुडी यांनी म्हटले.

आपली प्रतिक्रिया द्या