महापालिकेच्या नगररचना ,उद्यान विभागात अनागोंदी कारभार; युवासेनेचा आंदोलनाचा इशारा

सामना प्रतिनिधी । नगर

महापालिकेच्या नगररचना आणि उद्यान विभागातील काही कर्मचारी कामामध्ये जाणून बुजून हलगर्जीपणा करत आहेत. बांधकाम परवानगी देतांना संबंधित शेत्रतात वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धन करण्याची जबाबदारी विकासकावर टाकण्यात येते. परंतु त्याचे पालन होताना दिसत नाही, तसेच ऐतिहासिक वास्तू परिसरात बांधकामास परवानगी देताना कायदातील पळवाटा शोधल्या जात असून असे प्रकार राजरोजसपणे घडत आहेत. नगररचना व उद्यान विभागात विभागात अनागोंदी कारभार सुरु असून संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी. अन्यथा महापालिकेत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युवासेनेने दिला आहे. या संदर्भात शिवसेना प्रणीत युवासेनेचे जिल्हाप्रमुख रवी वाकळे, जिल्हा समन्वयक सुमित कुलकर्णी, नगरसेवक योगीराज गाडे, यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले. यावेळी अमित गटणे, जय बिडकर, विकी पवार, सोमनाथ देवकर, प्रशांत चौधरी, शाम तिवारी, आशिष दांडगे, गिरीषशर्मा, रणजीत नन्नवरे उपस्थित होते.