सरकार असेपर्यंतच भाजपसोबत! रामदास आठवलेंची जाहीर कबुली

50
ramdas-atahwale

सामना ऑनलाईन, मुंबई

ऐन दिवाळीत रिपाईचे(आठवले गट) अध्यक्ष आणि सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस नेत्यांसोबत एका कार्यक्रमात सहभागी होत शाब्दीक फटाका फोडल्याने भाजप नेत्यांची पाचावर धारण बसली आहे. “जोपर्यंत सरकार आहे तोपर्यंत मी त्यांच्यासोबत राहणार त्यानंतर मी हवा कुठल्या दिशेने वाहतेय हे पाहून पुढचा निर्णय घेईन” असं रामदास आठवले यांनी विधान केलं आहे. मुंबईमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. आठवले म्हणाले की “नसीम खान म्हणतायत की तुम्ही आमच्यासोबत या. मी काँग्रेससोबत 10-15 वर्ष होतो, मला आता इथे पण 10-15 वर्ष रहावं लागेल” हे वाक्य पूर्ण झाल्यानंतर आठवले यांनी सरकार आहे तोपर्यंत मी भाजपसोबत राहीन असं म्हणत गुगली टाकला आहे.

रामदास आठवले यांच्या या विधानानंतर ट्विटरवरून मजेशीर प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एकाने म्हटलंय की त्यांना राजा हरिश्चंद्र पुरस्कार द्यायला हवा तर दुसऱ्या एका ट्विटर वापरणाऱ्याने म्हटलंय आठवलेंइतका खरा बोलणारा माणूस सध्या राजकारणात नाहीये.

आपली प्रतिक्रिया द्या