घोटाळेबाजांवर कठोर कारवाई करणार!

20

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बँकिंग क्षेत्रातील आजपर्यंतचा सर्वात मोठा पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) 11400 कोटी रुपयांच्या घोटाळ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर मौन सोडले आहे. जनतेच्या पैशांची लूट खपवून घेणार नाही. घोटाळेबाजांवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन पंतप्रधानांनी दिले आहे.

पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळा उघडकीस येऊन दहा दिवस झाले. त्यावर आज पहिल्यांदा पंतप्रधानांनी भाष्य केले. मात्र, ‘पीएनबी’ किंवा मुख्य आरोपी नीरव मोदीचे नाव त्यांनी घेतले नाही. इकॉनॉमिक ग्लोबल समिटमध्ये बोलताना पंतप्रधान म्हणाले, आर्थिक गैरप्रकार रोखण्यासाठी सरकारकडून कारवाई सुरू आहे. घोटाळेबाजांवर सरकार कठोर कारवाई करेल. जनतेच्या पैशांची लूट खपवून घेतली जाणार नाही.

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी बँकेचे व्यवस्थापन, अॅडिटर्स आणि अप्रत्यक्षरीत्या रिझर्व्ह बँकेला फटकारले. ज्यांच्याकडे कामाची नियमावली करण्याची जबाबदारी आहे त्यांनी धोरण आणि मूल्यांची जपवणूक केली पाहिजे. कामावर देखरेख आणि तपासणी करण्याची जबाबदारी असणाऱ्यांनी याकडे अधिक लक्ष द्यावे असे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या