…तर अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश: मुख्यमंत्री

सामना ऑनलाईन । मुंबई

कमला मिल कंपाऊंडमधील ‘वन-अबव्ह’ आणि ‘मोजोस बिस्ट्रो’ टेरेस या पबना लागलेल्या आगीप्रकरणी पब मालकांवर कारवाई करण्यात येत असून अधिकाऱ्यांनी जाणूनबूजून दुलर्क्ष केल्याचे चौकशीत आढळल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

दरम्यान, या परिसरातील अन्य बांधकामे आणि पब्स यांचे ऑडिट करण्याचे आदेश दिल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

शुक्रवारी मध्यरात्री उशिरा लागलेल्या आगीत १४ जणांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला आहे. याप्रकरणी महापालिकेच्या पाच अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.