राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

2649

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्यामुळे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले आणि समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या राजगृहात काही समाजकंटकांनी तोडफोड केली. राजगृहाच्या आवारात घुसून धुडगूस घातल्याचा या घटनेनंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील ‘राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही’, असे म्हणत कडक कारवाईचे आश्वासन यावेळी दिले आहे.

CMO च्या ट्विटर हँडलवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबद्दलची माहिती ट्विट केली आहे. ‘राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समाजाचे श्रद्धास्थान आहे. आपला ग्रंथखजीना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तुत जपून ठेवला. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्रच आहे’, असे उद्धव ठाकरे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे. तसेच राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. कडक कारवाईचे आदेश मी पोलीसांना दिल्याचे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या