आता फक्त PoK वरच चर्चा होणार, राजनाथ सिंह यांनी ठणकावले

1076

पाकिस्तानानने दहशतवादाला पाठिंबा बंद करावा आणि आता जी काही चर्चा होईल ती आता पाकव्याप्त कश्मीरवर होईल असा सज्जड इशारा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिला आहे. हरयाणाच्या पंचकुलामध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे व्यक्तव्य केले आहे.

सिंह म्हणाले की, “काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले होते की हिंदुस्थान बालाकोटपेक्षा मोठी कारवाई करू शकतात. म्हणजेच हिंदुस्थानने बालाकोटमध्ये कारवाई केली होती हे पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी ही बाब मान्य केली आहे.” तसेच जम्मू कश्मीरच्या विकासासाठी कलम 370 हटवण्यात आले आहे. त्यावर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर मदत मागितली आहे परंतु जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देणे बंद करत नाही तो पर्यंत चर्चा होणार नाही आणि आता चर्चा फक्त पाकव्याप्त कश्मीरवर होणार असेही सिंह यावेळी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या