विल्सनचा रोटी, कपडा, पाणी सामाजिक उपक्रम

सामना ऑनलाईन। मुंबई

दरवर्षीप्रमाणेच यंदाही विल्सन कॉलेजमधील बीएमएसच्या विद्यार्थ्यांतर्फे एका सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रोटी कपडा पाणी असे या सामाजिक उपक्रमाचे नाव आहे. या उपक्रमातंगर्त शुक्रवारी विद्यार्थ्यांतर्फे गरीब व गरजू लोकांना अन्न, पाणी व कपड्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

यावेळी विद्यार्थी शहरात फिरुन लोकांकडून अन्न, कपडे, व पाण्याच्या बाटल्या गोळा करणार असून धारावी, आणि माहिम येथील गरिब वस्त्यांमध्ये त्यांचे वाटप करणार आहेत.