Live – नागरिकत्व विधेयक राज्यसभेत मंजूर

1417
amit-shah

 • 117 विरुद्ध 92 च्या फरकाने विधेयक मंजूर
 • नागरिकत्व विधेयक राज्यसभेत मंजूर
 • थेट विधेयकावर मतदानाला सुरुवात
 • शिवसेना खासदारांचा राज्यसभेतून वॉकआऊट
 • नागरिकत्व सुधारणा विधेयक सिलेक्ट समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव फेटाळला
 • राज्यसभेत विधेयकावर मतदानाला सुरुवात
 • अफगाणिस्तानात बॉम्बने बुद्धांच्या मूर्तीं उडवल्या आहेत
 • अफगाणिस्तानात फक्त 500 शीख व हिंदू राहिले आहेत.
 • पाकिस्तानात ख्रिश्चनांना अस्पृश्य मानले जात आहे.
 • पाकिस्तानात हिंदूची फक्त 20 धार्मिक स्थळं
 • नागरिकत्व विधेयकावरील काँग्रेसच्या नेत्यांचे वक्तव्य व पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे वक्तव्य समान
 • काँग्रेसच्या वक्तव्यांचा पाकिस्तान वापर करतो
 • या विधेयकात मुस्लिमांच्या नागरिकत्वाला हात लावलेला नाही मग हे विधेयक मुस्लिम विरोधी कसे
 • नरक यातनेत राहणाऱ्या लाखो करोडो लोकांना न्याय देण्यासाठी हे विधेयक – अमित शहा
 • पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजेसाठी हायकोर्टाची परवानगी घ्यावी लागते
 • 2020 पासूनच नागरिकत्त्व देण्याची प्रक्रीया सुरू करणार
 • मागणी कुणीही केली असेल मात्र काँग्रेसने ती मान्य का केली
 • धर्माच्या आधारावर काँग्रेसने फाळणी का मान्य केली
 • पाकिस्तानात राहणाऱ्या हिंदू व शीख यांना जर तिथे राहायचे नसेल तर त्यांनी हिंदुस्थानात यावे. तुमचं पुनर्वसन करण्याचे काम आमचे सरकार करेल, असे महात्मा गांधी यांनी देखील सांगितले आहे.
 • काँग्रेस पार्टी पाकिस्तानातील सर्व गैर मुस्लिमांना सुरक्षा देण्यास बांधिल असल्याचे काँग्रेसच्या रिझोल्यूशनमध्ये आहे. आम्ही तेच पूर्ण करतोय
 • हे विधेयक हिंदुस्थानात राहणाऱ्या मुस्लिमांना नुकसान देणारं नाही – अमित शहा
 • आम्ही 1950 पासून कलम 370 हटविण्यावर ठाम आहोत, नागरिकत्व कायदा हटविण्याबाबत ठाम होतो
 • आम्ही तिन्ही देशातील धार्मिक अत्याचार होत असलेल्या अल्पसंख्यकांनाच घेत आहोत.
 • आम्ही सहा धर्मियांना नागरिकत्व देत आहोत. फक्त मुसलमानांना देत नाही म्हणून आम्ही धर्मनिरपेक्ष नाही असे बोलले जातेय
 • त्यामुळे आम्ही या विधेयकात फक्त हिंदू, जैन, शीख, इसाई, ख्रिश्चन यांना नागरिकत्त्व देणार आहोत.
 • ज्या मुस्लिमांवर अत्याचार होत असतील त्यांनाही आम्ही नागरिकता देऊ
 • ज्या देशाचा धर्मच इस्लाम आहे तर तिथे मुस्लिमांवर धार्मिक अत्याचार होण्याचे प्रकार कमी आहेत.
 • बांगलादेश, पाकिस्तान व अफगाणिस्तानात मुसलमान अल्पसंख्यांक मानले जातात का ?
 • यात मुस्लीम का नाहीत हा प्रश्न विचारला जात आहे
 • पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान हे तिनही देश इस्लामिक स्टेट आहेत.
 • देशाच्या समस्यांचे समाधान करणे हे आमचे महत्त्वाचे काम
 • या महत्त्वाच्या प्रश्नाला राजनितीक कपडे घालण्याची गरज नाही – अमित शहा
 • इंदिरा गांधींनी बांगलादेशच्या शरणार्थींना स्वीकारले तेव्हा आम्ही श्रीलंकेला का नाही दिलं हे विचारलं नाही.
 • या देशाने अनेकांनी नागरिकता दिलेली आहे. श्रीलंकेतून आलेल्यांना नागरिकत्त्वा दिली तेव्हा आम्ही प्रश्न नाही विचारला
 • लाखो करोडो लोकं आमच्यासोबत अन्याय झाला हे ओरडून सांगत आहेत ते तुम्हाला ऐकायला येत नाही
 • हिंदुस्थानने अल्पसंख्यांकाबाबतचे आपले वचन पाळले मात्र आपल्या शेजारच्या देशांनी नाही पाळले
 • या देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान मुसलमान बने
 • फाळणी धर्माच्या आधारावर झाली आणि ती सर्वात मोठी चूक होती
 • हे विधेयक 50 वर्ष आधी आणलं असतं तर देशातील परिस्थिती इतकी गंभीर नसती झाली
 • आम्ही देशाला सुधारण्यासाठी आलोय – अमित शहा
 • फाळणीनंतर ज्या समस्या निर्माण झाल्या त्या समस्यांचे निवारण करण्यासाठी हे विधेयक आणावे लागतेय
 • जर या देशाची फाळणी झाली नसती तर हे विधेयक आणावेच लागले नसते
 • अमित शहा यांचे विधेयकाच्या चर्चेला उत्तर
 • आमच्या शाळेचे हेडमास्टर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, अटलजी, श्यामाप्रसाद मुखर्जी होते
 • आप जिस स्कूलमें पढते है, उसके हम हेडमास्टर है। संजय राऊत यांचा जबरदस्त टोला
 • आम्हाला कुणाकडून हिंदू असल्याचे सर्टिफिकेटची गरज नाही
 • आमच्या देशाला पोलादी गृहमंत्री म्हणाले आहेत, त्यांनी 370 हटवले आम्ही त्यांचे स्वागत केले
 • पाकिस्तानची भाषा आम्हाला मान्य नाही
 • शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या भाषणाला सुरुवात
 • या विधेयकाचे नाव सुवर्ण अक्षरात लिहिले जाईल पण जिन्नांच्या कबरेवर असा घणाघाती वार डेरेक ओ ब्रायन यांनी केला
 • डेरेक ओ ब्रायन यांनी आपल्या भाषणातून सरकारवर हल्लाबोल केला

राज्यसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू असताना आसाममध्ये आंदोलन, आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या

 • जेपी नड्डा यांच्यानंतर डेरेक ओब्रायन यांच्या भाषणाला सुरुवात
 • जेपी नड्डा यांची विरोधकांवर टीका
 • नागरिकत्व सुधारणा विधेयकाला संपूर्ण समर्थन – जेपी नड्डा
 • भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार जेपी नड्डा यांचे भाषण सुरू
 • काँग्रेस नेते आनंद शर्मा यांचे भाषण पूर्ण
 • गांधीजींचे नाव, चष्मा फक्त जाहिरातीसाठी नाही, गांधीजींच्या चष्म्यातून देशाकडे बघायला शिका
 • एनआरसी नंतर डिटेन्शन सेंटर तयार करण्यात आले आहेत, त्यांची स्थिती अत्यंत भयंकर आहे
 • कोणत्याही पक्षाच्या वचननाम्यापेक्षा संविधान महत्त्वाचे
 • याआधी हिंदुस्थानने सुधारणा विधेयकात धर्माचा आधार घेतला नव्हता, पण हे विधेयक धर्माच्या आधारावर यांनी आणले आहे, त्यामुळे संविधानाला धरून हे सुधारणा विधेयक नाही
 • ‘टू नेशन’ थेअरी हिंदुमहासभेने आणली होती, त्यानंतर मुस्लीम लीगने ही मागणी केली होती, हे हिंदुस्थानचा इतिहास विसरू शकत नाही
 • इतिहास बदलला जाऊ शकत नाही
 • फाळणीवेळी जो नरसंहार झाला तो दुखद होता, मात्र त्याकाळी संविधान निर्मात्यांनी सर्वांशी समानता राखत न्याय देण्याचे काम केले
 • नागरिकते संदर्भात सरकारचे धोरण चुकीचे आहे, विधेयकात बदल करण्यासाठी इतकी घाई का?
 • हे विधयेक सर्वांशी चर्चा करून आणल्याचे सरकारचे म्हणणे खोटं आहे – आनंद शर्मा
 • काँग्रेस नेते आनंद शर्मा यांचा सरकारवर हल्लाबोल
 • विधेयकावर चर्चेला सुरुवात
 • अमित शहा यांचे भाषण संपले
 • आसामच्या समस्येवर निश्चितच लवकर तोडगा निघेल
 • पण क्लॉज 6 नुसार कमिटी आतापर्यंत बनलीच नव्हती, पण मोदींच्या नेतृत्वात ती कमिटी बनली
 • राजीव गांधी यांनी मोठ्या भावनेने क्लॉज 6 नुसार कमिटीला मान्यता दिली
 • आसामसंदर्भात राजीव गांधी यांनी क्लॉज 6 बनवण्यात आले होते
 • आसामसंदर्भात कटू सत्य सांगणार आहे
 • ईशान्येकडील राज्यांत हे विधेयक लागू नसेल
 • या निर्वासितांवर अवैध प्रवासी म्हणून खटले असतील त्याला मागे घेण्यात येईल
 • जे निर्वासित ज्या तारखेपासून आले त्यांना त्या दिवसापासूनच नागरिकत्व दिले जाईल
 • पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान या तीन देशातील हिंदू, जैन, ईसाई, शीख, पारशी, बौद्ध हिंदुस्थानात आले तर त्यांना अवैध प्रवासी मानले जाणार नाही
 • धार्मिकतेच्या आधारावर ज्यांच्यावर अन्याय होत आहे अशा निर्वासितांनी कुठे जायचं? त्यांच्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले आहे
 • या देशातील जे मुसलमान नागरिक आहेत ते होते, आहेत आणि राहतील
 • पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान या तीन देशातील हिंदू, जैन, ईसाई, शीख, पारशी, बौद्ध हिंदुस्थानात आले आहेत त्यांना नागरिकत्व दिले जाईल
 • भाजपने आपल्या वचननामामध्ये हे स्पष्ट रुपात हे म्हटले होते
 • हिंदुस्थानात आलेल्या या निर्वासितांना त्यांचे हक्क मिळावे, यासाठी आम्ही हे विधेयक आणलं आहे
 • त्यांची संख्या वेगानं कमी होत आहे, काही मारले जात आहेत, काहींचे धर्मपरिवर्तन करण्यात आले, काही हिंदुस्थानात आले
 • पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानमध्ये अल्पसंख्याकांचे हाल
 • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत विधेयक मांडलं
 • राज्यसभेत चार खासदारांना अधिकृत सुट्टी जाहीर, बहुमताचा आकडा 119 पर्यंत खाली आला

आसाममध्ये तणाव कायम, मोठ्याप्रमाणावर पोलिसांच्या तुकड्या तैनात

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संसदेत पोहोचले, 12 वाजता राज्यसभेत विधेयक मांडणार

 • जे आमच्या मनात आहे, तेच आम्ही बोलतो – संजय राऊत
 • शिवसेना कधीही कोणाच्या दबावाखाली काम करत नाही – संजय राऊत
 • शिवसेनेने जनतेचे प्रश्न उचलून धरलेले आहेत, सरकारकडून काय उत्तर मिळणार त्यावर आमची भूमिका आम्ही ठरवू – शिवसेना नेते, खासदार संजय राऊत

नागरिकत्व (सुधारणा) विधेयकाविरोधात राजदचं आंदोलन, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीकेची झोड

 • राज्यसभेचे कामकाज सुरू
 • मी ईशान्य हिंदुस्थानातील नागरिकांच्या सोबत, त्यांच्या सेवेसाठी तयार – राहुल गांधी
 • नागरिकत्व (सुधारणा) विधेयकावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आक्रमक

 • संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी बैठकीनंतर दिली माहिती
 • नागरिकत्व (सुधारणा) विधेयक ऐतिहासिक असल्याचे पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितले

 • राज्यसभेत आज मांडल्या जाणाऱ्या नागरिकत्व (सुधारणा) विधेयकासंदर्भाती रणनीतीची चर्चा झाल्याची माहिती
 • भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्षाच्या संसदीय बैठकीसाठी उपस्थित

 • थोड्याच वेळात भाजपच्या संसदीय बैठक सुरू होणार
 • दोन्ही सभागृहाच्या कामकाजाकडे सर्वांचे लक्ष
 • संसदेच्या हिवाळी अधिवेशन
आपली प्रतिक्रिया द्या