गांधी घराण्याच्या सुरक्षेत कपात, एसपीजी कव्हर हटवले

काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी काँग्रेस अध्यक्ष व खासदार राहुल गांधी, काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांच्या सुरक्षेत केंद्र सरकारकडून कपात करण्यात येणार असल्याचे समजते. गांधी परिवाराला देण्यात आलेले एसपीजी कव्हर काढून टाकण्याचे समोर आले आहे. आता त्यांना फक्त झेड प्लस सुरक्षा राहणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गांधी घराण्याला सध्या कोणताही धोका नसल्याने त्यांची एसपीजी सुरक्षा काढून घेण्यात असून त्यांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचे ट्रेनिंग देण्यात आलेले कमांडो देण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या