टायरविना पोलीस जीप दहा दिवसांपासून धूळखात, शहरासह ५९ गावातील गस्त झाली बंद

37

सामना प्रतिनिधी । जिंतूर

जिंतूर शहर व परिसरात पोलिसांच्या कर्तव्याला तत्परता प्रदान करणारी पोलीस जीप मागील १० दिवसांपासून टायर फुटल्याने धूळखात पडली आहे. परिणामी पोलिसांना शहरासह कार्यक्षेत्रातील ५९ गावात गस्त घालणे दुरापास्त झाले आहे.

जिंतूर पोलीस ठाणे अंतर्गत तालुक्यातील जवळपास ५९ गावे जोडण्यात आली असून शहरासह या गावांमध्ये कायदा, सुव्यवस्था व शांतता प्रस्थापित करण्यासाठी तसेच कर्तव्याला गती प्रदान करण्याकरिता पोलीस ठाण्याला दोन पोलीस वाहन देण्यात आल्या होत्या. मात्र आजघडीला या दोन्ही वाहने कालबाह्य अवस्थेत रस्त्यावर धावत असून कधी कोणती वाहन कोठे बंद पडेल हे सांगणे खूप कठीण आहे. त्यातच पोलीस वाहन (क्रमांक एम.एच. २२ डी ७१४०) चे टायर पुâटल्याने वाहन चक्क १० दिवसांपासून पोलीस ठाण्यातच धूळखात पडून आहे. आता पोलिसांची मदार एकमेव वाहनावर अवलंबून असून ते ही भंगारवस्थेत रस्त्यावर धावत आहे. परिणामी पोलिसांना शहरासह ५९ गावात गस्त घालणे कठीण झाले आहे. परिणामी शहर व परिसरात भुरटे चोर सक्रिय झाले आहेत. शिवाय गस्तीविना रात्री अपरात्री गल्लीबोळात व रस्स्यावर संशयास्पद व्यक्तींची संख्या वाढत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या