पुणे – 16 वर्षांपासून गुंगारा देणाऱ्या महिलेला गुन्हे शाखेने केली अटक

परदेशात नोकरी लावण्याच्या आमिषाने लोकांकडून पैसे उकळून तब्बल 16 वर्षांपासून पोलिसांना गुंगाऱ्या देणाऱ्या आरोपी महिलेला गुन्हे शाखेच्या युनीट एकने अटक केले. राहत तालीबअली सैय्यद उर्फ अलका भगवानदास शर्मा (वय – 54, रा. विमाननगर, मूळ- दिल्ली ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

खडक पोलीस ठाण्यातंर्गत जुलै 2005 मध्ये फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित गुन्ह्यात आरोपी महिलेने अनेकांना परेदशात नोकरी लावण्याच्या आमिषाने चार लाखांची फसवणूक केली होती. त्यानंतर महिला फरार झाली होती.

बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरणाऱ्या भावडांसह तिघांना अटक

संबंधित महिला नाव बदलून विमाननगरमध्ये राहत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून राहत उर्फ अलका हिला ताब्यात घेतले. चौकशीत तिने फसवणूकीची कबुली दिली.

सामूहिक बलात्कारानंतर महिलेची हत्या, पोलिसांनी ‘कंडोम’च्या मदतीने केली गुन्ह्याची उकल

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी, अजय थोरात, इम्रान शेख, तुषार माळवदकर, मिना पिंजण, रूखसाना नदाफ यांनी केली.

तिहार तुरुंगात कुख्यात गुंडाचा मृत्यू, कैद्यांमधील हाणामारीत जीव गेल्याचा पोलिसांचा दावा

आपली प्रतिक्रिया द्या