मांजराला हुसकावून लावल्याने तरुणीला मारहाण

836

घरात आलेले शेजाऱ्याचे मांजर हुसकावून लावल्याच्या कारणावरून चार जणांनी एका तरुणीला मारहाण केली. ही घटना वाकड येथे शनिवारी (दि. 4) दुपारी घडली. पुजा रमेश दलपत (वय 24, रा. प्रभात कॉलनी, वाकड) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणीचे नाव असून त्यांनी शनिवारी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शोभा दलपत, तानाजी दलपत, शारदा वाघमारे आणि कृष्णा वाघमारे (सर्व रा. वाकड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास शेजाऱ्यांचे मांजर फिर्यादी यांच्या घरात आले. यामुळे पुजा यांनी त्या मांजराला हुसकावले. या कारणावरून चिडलेल्या आरोपींनी आपसांत संगनमत करून शिवीगाळ करीत पुजा यांना मारहाण केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सपना देवतळे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या