‘ही’ आहे जगातील पहिली ट्रान्सजेंडर खेळाडू

81

सामना ऑनलाईन । मुंबई

क्रीडा जगतात टिफनी अब्रियू हे नाव सध्या जगभरात चर्चेत आहे. कारण टिफनी जगातील पहिली ट्रान्सजेंडर व्हॉलिबॉल खेळाडू असून तिने नुकतीच लिंगबदलाची शस्त्रक्रिया करून घेतली आहे. ब्राझीलची व्हॉलिबॉल सुपरलीगमध्ये टिफनीने दमदार कामगिरी केली आहे. टिफनीला आता ऑलिम्पिकमध्ये महिला संघाकडून खेळण्याची इच्छा आहे.

लिंगबदलाच्या शस्त्रक्रियेपूर्वी टिफनीने पुरूष म्हणून २०१२ पर्यंत ब्राझील, पोर्तुगाल, फ्रान्स, इंडोनेशिया, स्पेन, हॉलंड, बेल्जियम यांसारख्या वेगवेगळ्या व्हॉलिबॉल स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. टिफनीने लिंगबदल केल्यानंतर व्हॉलिबॉल न खेळण्याचाही विचार केला होता. पण नंतर तिने तो विचार झटकून टाकत नव्या जोमाने महिला म्हणून व्हॉलिबॉल खेळण्यास सुरुवात केली.

काही दिवसांपूर्वीच वोली बोरू संघाकडून खेळताना तिने २५ पॉइंटची कामगिरी केल्याने पिनेरियोसला ३-०१ असा पराभव केला होता. एका मुलाखती दरम्यान ब्राझीलचे प्रशिक्षक जोस रोबर्टो यांनी म्हटले की, ‘टिफनीने आतापर्यंत अनेक व्हॉलिबॉल स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. तिचा खेळ लक्षात घेता तिला ऑलिम्पिकमध्ये नाकारण्याचे कोणतेही कारण मला सध्यातरी दिसत नाही, असे त्यांनी सांगितले’.

आपल्या खासगी आयुष्याबाबत बोलताना तिने सांगितले की, ‘लिंगबदल केल्यानंतर माझ्यावर अनेक लोकांनी टीका केली. वेळोवेळी होणाऱ्या या टीकेकडे मी दुर्लक्ष करत राहिले. शिवाय आपल्यावर टीका झाली म्हणून आपण थांबण्याचे काहीच कारण नसते. माझ्या लिंगबदलाचा निर्णय मी यापूर्वीच माझ्या आईला सांगितला होता. त्यामुळे तिच्यासमोर जायला मला कधीच भीती वाटली नाही. मी लिंगबदल केल्यानंतरही माझी आई मला रोडरिगो या जुन्या नावानेच हाक मारत असून ती पहिल्यापेक्षा आता माझ्यावर जास्त प्रेम करते, असेही टिफीनीने सांगितले’.

आपली प्रतिक्रिया द्या