चित्रपटगृहात खाद्यपदार्थ नेण्यासाठी महिलेचे गरोदरपणाचे नाटक

68

सामना ऑनलाईन । सिडनी

आपले आवडते खाद्यपदार्थ चित्रपटगृहात नेण्यासाठी कोण काय शक्कल लढवेल काही सांगता येत नाही. ऑस्ट्रेलियातील एंजेला ब्रिस्क या तरूणीने चित्रपटगृहात जाण्याआधी स्वत:च्या पोटावर एक गोलाकार बाऊल ठेवला. त्यात तिने तिच्या आवडते पॉपकॉर्न टाकले व गरोदरपणाचे नाटक केले.

एंजेला तिच्या या कारनाम्याचा फोटोही ट्विटरवर शेअर केला आहे. ‘मी चित्रपटगृहात खाद्यपदार्थ घेऊन जाण्यासाठी नवीन शक्कल लढवली आहे’, असे कॅप्शन तिने फोटोला दिले आहे. या युक्तीचे काही जणांनी अभिनंदन केले असून चित्रपटगृहातले पॉपकॉर्न फार महाग असतात. त्यामुळे ते परवडत नाहीत आणि बाहेरील पदार्थ आत नेण्यास परवानगी नसल्याने ही युक्ती नक्कीच लढवता येईल असेही म्हटले आहे.

पोलिसांनी तिच्या संशयास्पद हालचाली पाहुन तिला अटक केली. अटक केल्यानंतर तिची तपासणी केल्यानंतर तिच्या पोटात बाऊल असून बाऊलमध्ये पॉपकॉर्न असल्याचे स्पष्ट झाले.

आपली प्रतिक्रिया द्या