फोनवर चॅट करता करता ‘ती’ ट्रॅकवर पडली, पाहा हा भयंकर व्हिडीओ

2405

मोबाईल हा सध्या लोकांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग बनला आहे. उठता बसत, चालताना, जेवताना लोकांच्या हातात मोबाईल असतो. रस्त्याने चालताना देखील हल्ली लोकं मोबाईलमध्ये बघतच चाललेले असतात. यामुळे बरेच अपघात झालेले देखील आपण ऐकलेले आहे. असाच काहीसा प्रकार एका महिलेसोबत घडला आहे.  मेट्रो स्थानकात मोबाईलवर चॅट करत चालत असलेली महिला प्लॅटफॉर्मवरून चक्क खाली पडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


स्पेन मधील एस्ट्रेको स्थानकावर ही घटना  24 ऑक्टोबरला घडली. ‘मेट्रो द माद्रिद’ या पेजवरून या घटनेचा व्हिडीओ प्रसिद्ध केला.
सीसीटीव्ही कॅमेरात ही घटना कैद झाली आहे.  ती महीला मेट्रो ची वाट बघत फोनवर चॅट करत असते. अचानक ती चॅट करत करत प्लॅटफॉर्म कडून ट्रॅकच्या दिशेने जात असते. मात्र ती मोबाईलमध्ये इतकी व्यस्त असते की तिला समजतच नाही की प्लॅटफॉर्म संपत आला आहे. त्याचवेळी एक भरधाव मेट्रो येताना दिसत आहे. मात्र त्या महिलेचे नशीब बलवत्तर म्हणून मोटरमनने वेळेत गाडी थांबवल्याने मोठा अपघात टळला.

.”स्थानकावर चालत असताना जर तुम्ही मोबाइल वापरत असाल तर आजुबाजूला ही तेवढच लक्ष द्यायला हवे. स्वतःची काळजी घ्यायला हवी”, असे आवाहन मेट्रो प्रशासनाकडून करण्यात आले आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर झपाट्याने व्हायरल होत असून आतापर्यंत 31 हजार  लोकांनी तो बघितला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या