
युट्युबवर एक व्हिडीओ अपलोड करण्यात आला असून तो पाहणाऱ्यांची बोबडी वळते आहे. हा व्हिडीओ इंग्लंडमधील एडनब्रिज भागातला आहे. हा भाग कॅम्पिंगसाठी (तंबू उभारून त्यात राहणे) प्रसिद्ध आहे. एक महिला कॅम्पिंगसाठी आली असताना पहाटे 3 च्या सुमारास तिला विचित्र आवाज ऐकू आला. आवाज कसला आहे हे पाहण्यासाठी ती तंबूच्या बाहेर आली होती. तिने मोबाईलचा फ्लॅश वापरून काही फोटो काढण्याचा प्रयत्न केला होता.
MrMBB333 या युट्युब चॅनलवर व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये महिलेने काढलेल्या फोटोंचा समावेश आहे. या फोटोंमध्ये एक विचित्र आकृती महिलेकडे पाहात असल्याचं दिसून आलं आहे. ही आकृती मानवासारखी दिसत असून रात्री फोटो काढल्याने तिचे डोळे चकाकताना दिसत आहेत. ही आकृती माणसाची आहे का जनावराची यावरून मतभेद आहेत. काहींनी दावा केला आहे की ही आकृती हिममानवाची असण्याची दाट शक्यता आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 79 हजार व्ह्यूज मिळाले असून काहींनी व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की हा महिलांकडे पाहणारा विकृत लिंगपिसाट असावा. दुसऱ्या एका व्यक्तीने प्रतिक्रिया देताना म्हटलंय की नाईट व्हिजन घातलेला माणूस झाडावर बसलेला दिसतोय.