अॅम्ब्युलन्स पोहोचली नाही, खाटेचे स्ट्रेचर करून आईला पोहोचवले रुग्णालयात

581
madhya-pradesh-hospital

मध्य प्रदेशच्या अनूपपूर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे रस्ता नसल्यामुळे शासकीय यंत्रणेतील अपयश समोर आले आहे. आजारी महिलेला दवाखान्यात नेण्यासाठी तिच्या कुटुंबातील सदस्यांनी दोरीच्या सहाय्याने खाट बांबूच्या आधाराने बांधली. हे प्रकरण 10 ऑगस्ट रोजीचे आहे.

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना महिलेचा मुलगा सोमलाल यादव म्हणाला, ‘माझ्या आईला हृदयविकार आहे. आम्ही डोंगरा पंचायतचे आहोत. येथे रस्ता नाही आणि पावसाळ्याच्या दिवसांत येथून बाहेर जाणे फार कठीण झाले आहे. अधिकारी येथे येऊन रस्ता बनवण्याचे आश्वासन देतात पण आजपर्यंत प्रश्न सुटलेला नाही.

ते पुढे म्हणाले, ‘आमचे घर मुख्य रस्त्यापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे. माझ्या आईला आजारी पाहून मी रुग्णवाहिका बोलवण्याचे ठरविले पण त्यांनी सांगितले की तिला येण्यास दोन तास लागतील. मग आम्ही ठरवलं की आम्ही स्वतःच हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. आमची दुचाकी मुख्य रस्त्यावर उभी होती. सोमलाल यादव म्हणाले की, रस्त्याशिवाय त्यांच्या गावात विजेची मोठी समस्या आहे.

महिलेचे पती हेमलाल म्हणाले, ‘रस्ता नसल्यामुळे आम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. राजकारणी आणि अधिकारी येतात पण आजपर्यंत काहीही झाले नाही. या संदर्भात पंचायत अधिकारी इम्रान सिद्दीकी म्हणाले की, ‘मला आज सकाळी याबद्दल माहिती मिळाली. जिल्हाधिकाऱ्यांनी मला तिथे जाण्यास सांगितले आणि सांगितले की गावातील लोकांसाठी जे काही शक्य आहे ते केले पाहिजे. आता आम्ही आमच्या अधिकारी आणि अभियंत्यांसह त्यावर काम करत आहोत.

आपली प्रतिक्रिया द्या