प्रत्यक्षर्शीला वाटलं की बलात्कार होतोय, सत्य मात्र भलतंच निघालं

इंग्लंडमधील ब्लॅकबर्न शहरातील ऑट्टरबर्न रस्त्यावर राहणाऱ्या एका महिलेने घाईघाईत पोलिसांना फोन केला. तिच्या डोळ्यासमोर जे घडत होतं, त्याबद्दल तिला सांगायचं होतं. एका महिलेवर एक माणूस बलात्कार करण्याचा प्रयत्न करत असल्याचा या महिलेला संशय होता. या महिलेला वाचवण्यासाठी तिने पोलिसांना फोन केला. ज्या महिलेला तिने पाहिलं होतं तिचं नाव कोरालिना लवरिज (31 वर्षे) असं आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी या महिलेला आणि तिच्यासोबत असलेल्या पुरुषाला ताब्यात घेतलं. या दोघांना ब्लॅकबर्न इथल्या न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयात सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला.

कोरालिना आणि तिच्यावर बलात्कार करत असल्याचा संशय असलेला पुरुष हे दोघे एकमेकांना चांगले ओळखत होते. हे दोघेही जण कामातुर झाल्याने आडोसा शोधत होते. यासाठी त्यांनी रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्यांमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. हे दोघे गाडीचा दरवाजा जबरदस्तीने उघडण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना एका प्रत्यक्षदर्शीने पाहिलं होतं. तसं त्याने न्यायालयातही सांगितलं आहे. गाडी उघडता येत नाही असं कळाल्यानंतर या दोघांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या हिरवळीवरच एकमेकांवर प्रेम करायला सुरुवात केली. ते पाहून प्रत्यक्षदर्शी महिलेला वाटलं होतं की कोरालिनासोबतचा माणूस तिच्यावर बलात्कार करतोय. माणुसकीच्या दृष्टीकोनातून या महिलेने पोलिसांना बोलावलं होतं.

कोरालिना आणि तिच्यासोबतच्या प्रियकराला पकडलं तेव्हा दोघेही दारूच्या नशेत होते. घडल्या प्रकाराबद्दल आपल्याला लाज वाटत असल्याचं कोरालिनाने शुद्धीवर आल्यावर सांगितलं. कोरालिनाने न्यायालयात आपला गुन्हा मान्य केला. यामुळे न्यायालयाने तिला 1 वर्ष समाजसेवा करण्याची आणि रात्री 7 ते सकाळी 7 घराबाहेर न पडण्याची शिक्षा दिली आहे. याशिवाय कोरालिनाला 140 पाऊंडाचा (14 हजार 140 रुपये) दंडही ठोठावला आहे.