फेसबुकवर वाईट प्रतिक्रिया दिल्याने तरुणीला हॉटेलमध्ये प्रवेशबंदी केली

66

सामना ऑनलाईन, उल्व्हरस्टोन

इंग्लंडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. हॉटेलबाब फेसबुकवर अत्यंत वाईट प्रतिक्रिया लिहल्याने एका तरुणीला त्या हॉटेलमध्ये प्रवेश करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. कॅटी स्वारब्रिक असं या तरूणीचं नाव असून रिओजा रेस्टॉरंटमध्ये हा प्रकार घडला आहे.

कॅटी तिच्या मित्रमैत्रिणींसह रिओजा हॉटेलमध्ये गेली होती. ऑर्ड दिल्यानंतर तासाभरानंतरही त्यांचे टेबल रिकामे होते. खायला आणायला वेळ लागत असल्याने सगळेजण वैतागले होते. या हॉटेलमध्ये आलेला अनुभव हा अत्यंत धक्कादायक होता, हॉटेलची सेवा अत्यंत वाईट होती अशी तक्रार तिने या हॉटेलच्या फेसबुक पेजवर जाऊन केली. काही दिवसांनंतर जेव्हा ती परत या हॉटेलमधअये गेली तेव्हा तिला बाऊंसरच्या मदतीने हॉटेलबाहेर काढण्यात आलं आणि प्रवेश नाकारण्यात आला.

हॉटेल व्यवस्थापनाने या प्रकाराबाबत बोलताना मुलीचे वर्तन उद्धटपणाचे होते असा दावा केला आहे. यावर त्या तरूणीने म्हटलं की मी रागावले जरूर होते मात्र मी उध्टटपणे अजिबात वागले नव्हते. हॉटेल प्रशासनाने या तरुणीला प्रवेश नाकारण्याबद्दल बोलताना म्हटलंय की आमच्या कर्मचाऱ्यांसोबत जो कोणी गैरवर्तन करेल त्याच्याबाबतीत आम्ही मवाळ धोरण स्वीकारत नाही. हॉटेलमध्ये बंदी तिच्या वर्तनामुळे घालण्यात आली आहे, तिने तक्रार केल्यामुळे नाही असंही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या